जनावरें चोरणारी सराईत टोळी गजाआड

Foto

गुन्हेशाखेने जप्त केला साडेपाच लाखाचा मुद्देमाल.

औरंगाबादसह नाशिक,धुळे,जळगाव जिल्ह्यातून जनावरे चोरी करणारी सराईत टोळीतिल तिघांच्या औरंगाबाद स्थानिक गुन्हेशाखेने मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून सुमारे साडेपाच लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.त्यांनी जिल्ह्यात पाच गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
शेख इम्रान शेख मुसा वय-28 (रा.सिल्लोड), अमीरखान अन्वरखान पठाण वय-34 (रा.राहिमाबाद, मालेगाव),असिफ अली शौकत अली वय-20 (रा.गुलशेरनगर,मालेगाव) असे अटक करण्यात आलेल्या टोळीतील तिघांची नावे आहेत.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अलीकडच्या काळात औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत शेतकऱ्यांची जनावरे चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते.या बाबत गुन्हे शाखेच्या पथकाने खबऱ्याना ऍक्टिव्ह केल्यानंतर जिल्ह्यातील जनावरांच्या चोरी मागे सिल्लोड येथील शेख इम्रान असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाल्याने गुन्हेशाखेच्या पथकाने वैजापूर कन्नड भागात  सापळा रचला.या दरम्यान औराळा ते पाणपोई या ठिकाणी ही टोळी येणार असल्याची दुसरी टीप पथकाला मिळताच पोलिसांनी सापळा रचला व विना क्रमांकाची पीक-अप वाहन येताच पोलिसांनी त्यास अडविण्याचा प्रयत्न केला मात्र ती वाहन सुसाट वेगात निघाली पोलिसांनी त्याचा पाठलाग करून गाडी  अडवत पोलोसांनि त्याना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता सुरुवातीला आरोपीनी उडवा-उडवीचे उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सिल्लोड ग्रामीण मध्ये 2 गुन्हे, वदोड बाजार येथे दोन गुन्हे आणि अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक असे एकूण जनावर चोरीचे पाच गुन्हे केल्याची कबुली दिली पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तीन मोबाईल सह पाच लाख 43 हजार 560 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे,भगतसिंग दुल्लत यांच्या पथकाने केली.आरोपी कडून औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.